Search This Blog

Friday, June 24, 2011

देवाचा तो स्वर्ग गाठला!!!

प्रेमाचा तो मौसम होता
रान गजबजलेले सारे,
वारा आला, फांदी तुटली
अवचित विपरीत घडले रे!!!

दोन पक्षी भिन्‍न जातीचे
प्रेमात पार बुडाले, वेडे,
जिवंत असता या जन्मी
कधी न त्यांची भेट घडे!!!

एके दिवशी भेट घडता
वैरी झाला समाज त्यांचा,
करुन वार चोचीचे त्यांना
जीव घेतला त्या दोघांचा!!!

कळले प्रेम कुणास न त्यांचे
देवही तेव्हा जागा झाला,
बघुन हा प्रकार सारा
देवाचाही अश्रू सांडला!!!

मरता मरता वचन दिले
त्या दोघांनी एकमेकांना,
या जन्मी तर जमले नाही
पुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!

त्या दोघांचा आत्मा तेव्हा
अनंतात त्या विलीन झाला,
भेटीसाठी मग वेड्यांनी
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!
देवाचा तो स्वर्ग गाठला!!! 

अशी असावी ती...

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी

ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी

केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी

थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी

हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी

चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी

जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी


आठवणींचं पान

एक जीर्ण आठवणींचं पान

आठवतो का तुला आपण मेटीनी ला गेलेलो?,

मी ऑफिसला दांडी मारून हाफत आलेलो,

घरच्याच  अवतारात बाहेर पडलेलो विसरून देहभान,

तिकीट मिळायची धडपड ती मोडेस्तोवर मान.,

शो संपताच बाहेर त्याच वेळेस पाउस आला घ्यायला,

कोपर्यातल्या टपरीवर आल्याचा गरम चहा होता प्यायला.,

छत्री नसता रिक्षेत बसलो थोडं कोरडं,खूप भिजलेलं,

घरी येताच तू माझं डोकं तुझ्या पदारानी पुसलेल.,

खूप वर्षा नंतर आजचा पाउस तसाच भासला,म्हणून मन स्वैर नाचलं,

जीर्ण झालेल्या आठवणींच्या पुस्तकाचं,आज एक पुसट पान वाचलं.

प्रेमकहाणी

आपलही कुणीतरी असाव
प्रत्येकाला वाटत
तीच्या भेटीच्या ओढीने
विचारांचं काहूर मनात दाटत

प्रेम करतो तुझ्यावर
मन सांगत असत ओरडून
पण सगळे शब्दच अडखळतात
तीला समोर बघून

तरीही गप्पा रंगत असतात
पण वेगळ्याच विषयांवरती
असतो शब्दांचा खेळ मांडलेला
तीच्या अवतीभवती

काही क्षणांसाठी का होईना
तीला डोळे भरून पहायचे असते
या ओस पडलेल्या मनात
तीच्या शब्दांना साठवायचे असते

सकाळ दुपार संध्याकाळ
दिवस नुसते सरत असतात
त्यातल्या त्यात पहाटेची स्वप्ने तर
कधीच खरी ठरत नसतात

पण काहीही असो............

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची
एकच असते कहाणी
कारण प्रत्येकाला पटवायची असते
आपल्या स्वप्नातली राणी

समजले अर्थ

अंकुर प्रीतीचा जन्मला तिच्या मनात
रोपटे मात्र त्याचे फुलले माझ्या अंतरात
   मनीषा होती व्हावे त्या रोपट्याचे वृक्ष विशाल
   पण वाटिकेमध्ये होती जोडीला झुडपे काटेदार
उचलले होते पाउल मोहाने प्रीतीच्या
पण टाकले नाही कधी भीतीने काट्याच्या
   वृक्ष व्हावे रोपट्याचे म्हणून केले मी  प्रयत्न वृथा
   होणार नाही असे काही हेच सांगे तिची व्यथा
कळून होते सर्व दृश्य भविष्याचे
पण मनाला होते मोह मृगजळाचे
   देत से सोबत मला विसरून सर्व भान
   तरी का वाटे सदैव, करते हातचे राखून दान?
होकार आणि नकाराने जेव्हा बदलत मार्ग तिचे
बदललेल्या त्या वाटेने दिसत से अश्रूच  माझे
    जखडले होते धैर्य माझे परिस्थितीने
   होते तसेच तिच्यावर ओझे संस्काराचे
उरले कुठलेच न देव न कुठलीच प्रार्थना
नसेल ज्यामध्ये मिळविण्याची तिला याचना
   उहा पोहाच्या ह्या विश्वात
   मात्र होते एक सत्य शाश्वत
   समजले अर्थ अडीच अक्षराचे
   दुसरे काही नाही नाम हे त्यागाचे....  

तु

वा-यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,
तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,
मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर" माझे"
पुन्हा मला दिसायची तु,
मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु..
------

तु जवळ नाहीस तरीही.........

तु जवळ नाहीस तरीही
मी एकटा कधीच नसतो
तुझ्या अस्तित्वाचा गंध
माझ्याभोवती दरवळत असतो
विरहाचे ऊन जाळते कधी
मनाची तगमग होते
तुझ्या डोळ्यातील शितलता
त्यावर ह्ळुच फुकर घालते
तुझ्या भेटीची ओढ
थंडी होउन अंगाला झोंबते
तुझ्या आठवणी शाल होउन
पांघरून घालीत उब देतात
संध्याकाळी,एकान्तवेळी
आठवणीचा वारा सुटतो
माझ्या प्रत्येक श्वासागणिक
तुझ्या केसाचा सुगंध येतो
होतो अबोल मग मी सुध्दा
अन् तुझ्यामधे रंगून जातो,
मी प्रेमात पडल्याच
प्रत्येक क्षण सांगून जातो...............